जिल्हा परिषदेच्या 69 शाळा मधील विद्युत पुरवठा थकीत बिलांअभावी खंडीत, उपसरपंचानी स्व-खर्चातून भरले बिल; विद्यार्थ्यांना दिलासा
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 69 शाळा मधील विद्युत पुरवठा थकीत बिलांअभावी खंडित करण्यात आला आहे. यामुळे ऐन परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भातील बातमी दाखविल्यानंतर गोरेगाव तालुक्यातील खाडीपर आणि चोपनटोली या दोन शाळांचा 15 हजारांचा विद्युत बिल खाडीपार येथील उपसरपंच यशवंत कावळे यांनी स्वतःच्या खिशातून भरला आहे. त्यामुळे या दोन शाळांमधील जवळपास 50 विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. व विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्युत बिल ग्रामपंचायतींनी भरावे असे आदेश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये अपुरा निधी असल्याने हे शक्य होत नाही.
परिणामी गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्युत बिल थकले आहेत. तर 69 शाळांचा विद्युत पुरवठा देखील महावितरणच्या वतीने खंडित करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात 5 लक्ष 80 हजार रुपये विद्युत बिल शाळांवर थकीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा आहेत व उन्हाळ्याचे दिवस असून पारा देखील चढत असताना याचा त्रास चिमुकल्या विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून उपसरपंच यशवंत कावळे यांनी पुढाकार घेत गोरेगाव तालुक्यातील चोपनटोली आणि खाडीपार अशा दोन्ही शाळांचे विद्युत बिल त्यांनी भरले आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली