माजी नगरसेवक सुनील जोशी व माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांचे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश दारावर अनोखे आंदोलन
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवपाडा भागात असलेल्या गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती शाळेजवळील मैदान या सर्व मैदानांवर विविध प्रकारचे व्यावसायिक प्रदर्शन भरत असतात. यामुळे स्थानिक मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नाही.
या विरोधात महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील जोशी व माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश दारावर क्रिकेट खेळून अनोखे आंदोलन केले. मैदानं स्थानिक मुलांना खेळासाठी उपलब्ध असू द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. जर यापुढे देखील मैदानांवर जर अशी प्रदर्शनं भरत असतील तर या पेक्षा तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी घेतली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली