LOKSANDESH NEWS
बार्शी शहरातील एमडी ड्रग्स प्रकरणाचे रॅकेट उघड, एमडी ड्रॅग प्रकरणात एकूण सहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बार्शी जवळील परांडा रोड येथे तिघा जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी केली होती कारवाई, गुरुवारी मध्यरात्री बार्शी शहर पोलिसांची कारवाई
बार्शी पोलीसांच्या प्रकरणात तपास करत असताना अजून तिघा जणांना ताब्यात घेतले
त्यामुळे एमडी ड्रग्स प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतले
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील चार जणांना तर बार्शी येथील दोन जणांना ताब्यात घेऊन करण्यात येत आहे चौकशी
बार्शी एमडी ड्रॅग प्रकरण धाराशिव सोलापूर आणि बीड जिल्ह्यापर्यंत पसरल्याचं आलाय दिसून
गुरुवारी तिघा जणांकडून 20 ग्रॅमचे एमडी ट्रकचे नऊ पाऊच तर एक गावठी पिस्टल, तीन जिवंत राऊंड असे घेऊन जाणारी एक कार पोलिसांनी केली जप्त करत तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
असद हसन देहलूज, मेहफूज मोहम्मद शेख, सर्फराज उर्फ गोल्डी असलम शेख यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात
बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र. नं 353/2025 एन. डि. पी. एस ऍक्ट कलम 8 (क), 22(ब), 29 तसेच सह कलम भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल