LOKSANDESH NEWS
शिंगवे येथील 70 फुट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाने व स्थानिक नागरिकांनी दिले जिवदान
चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी बापू देवराम गुंड शेत गट नंबर 598 महात्मा फुले नगर या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत कोल्हा पडल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्याने, त्या संदर्भात आत्माराम खताळ सरपंच शिंगवे यांनी चांदवड येथील वन विभागीय कार्यालय यास फोन द्वारे माहिती दिली.
त्यावरून वन विभागीय कार्यालय येथील कर्मचारी हे काही साहित्यसह हजर होऊन विहिरीत दोरीच्या व प्लास्टिकच्या जाळ्याने कोल्ह्याला वरती काढून त्याच ठिकाणी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नैसर्गिक अधिवासात सुखरूप काढून सोडण्यात आले. अशी माहिती प्रकाश सोमवंशी वनविभागी अधिकारी यांनी दिली.