गुहागर आगारासाठी पाच नवीन बसेस उपलब्ध, भास्कर जाधव यांनी स्वतः आगाराच्या आवारात बस चालवून घेतली ट्रायल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

गुहागर आगारासाठी पाच नवीन बसेस उपलब्ध, भास्कर जाधव यांनी स्वतः आगाराच्या आवारात बस चालवून घेतली ट्रायल

LOKSANDESH  NEWS 

गुहागर आगारासाठी पाच नवीन बसेस उपलब्ध, भास्कर जाधव यांनी स्वतः आगाराच्या आवारात बस चालवून घेतली ट्रायल  

 गुहागर एसटी आगारासाठी पाच नवीन बसेस उपलब्ध झाल्या. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने या बस गुहागर आगारात दाखल झाल्या आहेत. या बसेसचा लोकार्पण सोहळा आज त्यांच्याच हस्ते पार पडला. यानंतर  भास्कर जाधव यांनी आगाराच्या आवारात स्वतः बस चालवून ट्रायल घेतली. दरम्यान केवळ लोकार्पण म्हणून ही एसटी आगारात चालवली.

दरम्यान 25 ते 30  वर्षांपूर्वी एसटीतून प्रवास करत असताना ड्रायव्हरची तब्येत बिघडली होती. त्यावेळी ओमळी ते चिपळूण अशी प्रवाशांनी भरलेली बस चिपळूणमध्ये आणली, त्यानंतर आज ही बस चालवली. आज ही एसटी ट्रायल बेस म्हणून बाहेर चालविण्याचा विचार होता, पण या गोष्टीचं कोणीतरी राजकारण करेल आणि डेपो मॅनेजरला त्रास देईल त्यामुळे डेपोतच गाडी चालविल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली