चोपडा तालुक्यातील 80 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी 21 एप्रिल रोजी आरक्षण सोडत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

चोपडा तालुक्यातील 80 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी 21 एप्रिल रोजी आरक्षण सोडत

LOKSANDESH  NEWS 





 चोपडा तालुक्यातील 80 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी 21 एप्रिल रोजी आरक्षण सोडत



 चोपडा तालुक्यातील 91 ग्रामपंचायत मधील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत वगळता उर्वरित 80 ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत 21 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. 

सन 2025 ते सन 2030 या कालावधीमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत काढण्याबद्दल प्राप्त झालेल्या जिल्हा प्रशासनामार्फत सूचनेनुसार 21 एप्रिल रोजी नगर परिषदेचे नाट्यगृहात 11 वाजता एससी एसटी नागरिकांचा मागासवर्ग यासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

 तर महिला आरक्षण सोडत दुपारी दोन वाजता महसूल उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. 



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली