LOKSANDESH NEWS
आता खरी शिवसेना आपलीच आहे अजूनही शिंदे गट असे अनेक जण म्हणतात तो शब्द आपण पुसून टाकला पाहिजे- नीलम गोऱ्हे
आता खरी शिवसेना आपलीच आहे. अजूनही शिंदे गट असे अनेक जण म्हणतात.पण गट हा आता शब्द आपण पुसून टाकला पाहिजे. निवडणुकीत शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना हे आपल्याला मिळाले आहे. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आपल्याला भेटले आहे. असे वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्या सांगली मध्ये महिला मेळावा मध्ये बोलत होत्या.
सांगलीच्या 2019 च्या पुरानंतर खूप अस्वच्छता होती. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यावेळी पुढे सरसावले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते. मात्र ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सांगलीकरांच्या मदतीला धावले, त्यामुळेच सांगलीच्या श्री गणेशाच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. असेही त्या म्हणाल्या.
लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार. लाडक्या बहिणी योजनेच्या पैशामुळे बँकांना कोट्यावधी रुपयाचे व्याज मिळाले. त्यामुळे बँकांनी बँकेत आलेल्या महिलांना किमान बसायला खुर्ची तर द्यावी. असेही गोऱ्हे म्हणाल्या.
बचत गटाकडे जर कोण पैसे मागत असेल तर शिवरायांचे जे तत्व होतं की.. "चुकीला माफी नाही" असा प्रयोग करायला एकनाथ शिंदेंना सांगायला पाहिजे. असेही गोऱ्हे म्हणाल्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली