LOKSANDESH NEWS
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचा 93 वा फिरता नारळी सप्ताह; हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहास आजपासून प्रारंभ झाला आहे. या फिरत्या नारळी सप्ताहाचे 93 वे वर्ष असून, जिल्ह्यातील घाटशीळ पारगाव या गावाला यंदाचा मान मिळाला आहे.
गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या हस्ते हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक या सप्ताहास उपस्थित आहेत.
टाळ मृदुंगाच्या गजरात विठुनामाचा गजर करत मोठ्या उत्साहात या सप्ताहाला सुरुवात झाली आहे. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली