माझा मुलगा आत्महत्या करुच शकत नाही विशाल गवळीच्या आईची प्रतिक्रिया
कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी तळोजा जेल मध्ये, असलेला आरोपी विशाल गवळी ने पहाटे साडेतीन वाजता गळफास लावून आत्महत्या केली, पहाटे साडेतीन वाजता टॉयलेट ला गेला असता, टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे.
मात्र, विशाल गवळी यांच्या आईने मोठे आरोप केले आहेत. की विशाल गवळी कधी आत्महत्या करू शकत नाही, आठ दिवसांपूर्वी फोन वर बोलणं झाल होतं. मला तळोजा कारागृहात त्रास देतात, तळोजा कारागृहातून विशालच्या आई वडिलांना फोन केल्याचं सांगतलं माझ्या मुलाने आत्महत्या केली नाही त्याला मारल- विशाल गवळीच्या आई आरोप केला आहे
आमच्या मुलाला मारलं गेलं आहे त्याची हत्या करण्यात आलेली आहे हे राजकारणी लोकांनी पैसे देऊन केलं आहे माझा मुलगा आत्महत्या करू शकत नाही, त्याला फसवलं गेलं आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली