LOKSANDESH NEWS
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असतानाही बुलढाणा जिल्ह्यात कालापासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. काल सायंकाळी लोणार, सिंदखेडराजा, चिखली तसेच बुलढाणा तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या अवकाळी पावसामुळे लोणार तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत आहे.
लोणार चिखली, सिंदखेड राजा तालुक्यातही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. काल अचानक काळेभोर ढग दाटून आले, काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे गहू, कांदा, भाजीपाला सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली