महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री अतुल सावे यांनी अभिवादन करत दिल्या शुभेच्छा
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील औरंगपुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री अतुल सावे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंत्री अतुल सावे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी त्या काळात जो परिश्रम घेतला आणि त्यामुळेचं आज मुली शिकून उच्च स्तरावर जावू शकल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनंती करतो की, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं ते मार्गदर्शन घेऊन आपण काम करावं.