बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीत पुन्हा शिरले अस्वल, दोन दिवसांपूर्वी याच परिसरात आला होता बिबट्या
उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी आणि खाण्याच्या शोधात वन्यप्राणी आपला मोर्चा आता मानवी वस्त्यांकडे वळवतांना दिसत आहेत, बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनी मध्ये रात्री एक भला मोठा अस्वल शिरला, नागरिकांनी आरडाओरड करत फटाके वाजवल्याने हे अस्वल पुन्हा जंगलात परत गेले.
बुलढाण्याच्या चहुबाजूने ज्ञानगंगा अभयारण्य आहे, यामध्ये अनेक हिस्त्र प्राणी वास्तव्यास आहेत, हेच प्राणी आता खाद्य आणि पाण्याच्या शोधात शहराकडे येण्याची शक्यता असल्याने या माढा कॉलनीतील संरक्षण भिंत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली