LOKSANDESH NEWS
चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट
चैत्री एकादशी निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न झाली चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री
विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे व श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ॲड माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले व नित्य उपचार विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे उपस्थित होते.
मंदिरातील श्रींचा गाभारा, सोळखांबी व श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी कामिनी, गुलाब, ड्रेसिंग सॉंग टेबल पाम, ऑर्किड, भगवा झेंडू, पिवळा झेंडू, वायसीस विटा, शेवंती, ब्ल्यू आणि पिंक डिजी, पांढरी शेवंती, अष्टर, चाफा व कमळ अशा विविध फुलांनी सजविण्यात आले आहे. विठ्ठल भक्त राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी ही आरास केली आहे. या मनमोहक आरासामुळे मंदिर उजळून निघाला आहे.