LOKSANDESH NEWS
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उसळला भीम सागर; मध्यरात्री केली फटाक्यांची आतिषबाजी
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ अशी कृतज्ञनेची भावना मनात घेऊन, ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ असा दिलेला विचार प्रत्येक क्षणी कृतीत जपणार्या हजारो अनुयायांचा जणू भीमसागरच मध्यरात्री बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात उसळला होता.
रात्रीचे 12 वाजले आणि क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस सुरू झाला. त्या क्षणाला फटाक्यांची आतिषबाजी आणि ‘जय भीम’चा नारा देत उपस्थितांनी महामानवाच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत, त्यांना अभिवादन केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली