प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत अनेकांनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत अनेकांनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

LOKSANDESH  NEWS 



प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत अनेकांनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ प्रफुल पटेल यांच्यात हस्ते करण्यात आला. दरम्यान, या मेळाव्यात अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती हंसा खोब्रागडे यांचा समावेश आहे. त्यांच्यासह विविध पक्षाच्या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

प्रफुल पटेल ON काका पुतण्या भेट

- रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्राची एक मोठी शिक्षण संस्था आहे. लाखो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिकत आहेत. अजित पवार विश्वस्त आहे आणि पवार साहेब हे अध्यक्ष आहेत आणि त्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारणीच्या बैठकीत दोघेही जर एकत्र आलेत तर, त्यात आश्चर्याची गोष्ट नाही. महाराष्ट्र आणि बारामतीच्या विकासासाठी जर पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांशी काही संवाद झाला तर, त्यात काही चुकीचं नाही. दोघांचे दोन वेगळे पक्ष आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या विकासासाठी जर दोघे एकत्र येत असतील तर त्यात चुकीचं नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. 

ON अमित शाह यांच्याकडे कुठलीही खंत किंवा तक्रार केलेली नाही

- अमित शाह यांच्याकडे कुठलीही खंत किंवा तक्रार केलेली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर सुनील तटकरेंकडे जेवणासाठी अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, मी एकत्र होतो. अशी कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही तिथेच सगळे भेटलो, जेवण केलं. 



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली