ठाण्यातील गावदेवी मैदानात "चैत्रोत्सव" या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ठाण्यातील गावदेवी मैदानात "चैत्रोत्सव" या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

LOKSANDESH NEWS 




                            ठाण्यातील गावदेवी मैदानात "चैत्रोत्सव" या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन 


विश्वास सामाजिक, ऋणानुबंध मित्र मंडळ व सारथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "चैत्रोत्सव" या गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचा बुधवारी गावदेवी मैदानावर शुभारंभ करण्यात आला. 


यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आयोजक व भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, वृषाली वाघुले, सारथीचे अमोल धर्में, ऋणानुबंध मित्र मंडळाचे दिनेश मालुसरे, मकरंद मुळे, रंगवल्लीचे वेध कट्टी, सचिन मोरे, संतोष साळुंखे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. हे प्रदर्शन ९ ते १६ एप्रिलपर्यंत ग्राहकांसाठी खुले राहणार असून, यामध्ये १०० पेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत.

      भारतातील सर्वात लोकप्रिय ग्राहक प्रदर्शन असून, उत्तम वस्तू किफायशीर भावात या प्रदर्शनात उपलब्ध केलेल्या आहेत, असा दावा आयोजकांनी केला आहे. उत्सवच्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादक, आयातदार आणि व्यापाऱ्यांमार्फत थेट सुंदर उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचती केली आहेत. या प्रदर्शनात लाकडी, सोफासेट, बैठक व्यवस्था, बेडशीट्स, विविध प्रकारच्या चटई, साड्या, पेंटिंग, विविध आकर्षक मूर्ती, सुंदर फ्रेम्स, घरगुती वापराची उपकरणे, पायाची व पाठीची मसाज करणारी साधने, खाद्यपदार्थ, कलाकृती साकारलेले कुर्ता, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, चिनी मातीच्या कुंड्या, इलेक्ट्रिक मोटारसायकल, सायकल आदीसह विविध उत्पादने या प्रदर्शनात पाहण्यास व विक्री करण्यास मिळतील. प्रदर्शन ९ ते  १६ एप्रिलपर्यंत सुरू असून, ग्राहकांसाठी प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ अशी राहणार आहे. यामध्ये दररोज लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, कलामंदिर तर्फे पैठणी व अन्य आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच या प्रदर्शनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रंगवल्ली तर्फे "छावा " रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत. 


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली