ठाण्यात लोढा बिल्डर च्या विरोधात मनसे आक्रमक
- ठाण्यात लोढा बिल्डर च्या विरोधात मनसे आक्रमक
- ठाण्यातील कोलशेत लोढा आमारा सोसायटी बाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी
- लोढा बिल्डर हजार मराठी तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे
- हे लोक आकर्षक ऑफर तयार करतात. आणि गरिबांसाठी स्वस्तात घर आणि अशाप्रकारे वेगवेगळ्या ऑफिस काढतात
- गणेश भोईर नावाचा एक रिक्षा चालक आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी लाईट बुक केला आणि ३ लाख रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्यांनी लोन साठी प्रोसेस केली. आणि त्यांचे लोन झाले नाही. आणि तो बुकिंग रद्द करायला आला आणि त्यांनी सांगितलं की, तुमचे जे काही अमाऊंट आहे ते तुम्ही कट करा. आणि बाकीचे काही पैसे परत करा
- मागील दोन वर्षांपासून त्याला बिल्डर कडून पैसे येत नाही
- काल त्याला सांगितलं की, तुला पैसे मिळणार नाही जे करायचे ते कर
- आजून एक केतकी नावाची मुलगी आहे. त्यांचा देखील हॉटेलचा व्यवसाय होता आणि आई-वडील नसलेली ती मुलगी आहे. त्यांनी देखील पंधरा लाख रुपये भरले आणि त्याला दहा लाख रुपये परत देण्यात आले
- आम्ही सोबत असल्यामुळे त्याचे पाच लाख रुपये कट करण्यात आले
- नाईक आणि पंडित नावाच्या महिला आहे. त्यांनी देखील दोन कोटी आठ लाखाचं घर घेतलं. त्याला 65 लाखाचा रुपये दंड आकारला गेला आहे
- अशा हजारो केस बिल्डरच्या विरोध आहे
- बिल्डर पैसे परत करत नाही
- अशा अनेक तक्रारी बिल्डरच्या विरोधात आमच्याकडे नागरिक घेऊन येत असतात
- लोढा हे मंत्री असल्यामुळे नागरिकांची दखल घेतली जात नाही
- रिक्षा चालक गणेश त्याचे पैसे परत मिळावे यासाठी एका वर्षापासून पाठपुरावा करत आहे
- मात्र, कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नव्हता
- बाबसहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आंदोलन करत आहोत
- जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही
- बिल्डर पैसे परत करत नाही
- हा एका बिल्डरचा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्र मधील बिल्डराचा हाच विषय आहे
- आमच्या गणेशने तीन लाख रुपये दिले आहेत. आणि तो सकाळी आठ वाजता रिक्षा काढून सायंकाळी सात पर्यंत रिक्षा चालवतो. तेव्हा त्याला एक हजार रुपये मिळतात आणि आता भागिले तीन लाख रुपये करा आणि त्याचे पैसे आम्ही खाऊन देणार नाही
- त्या रिक्षा चालकाला तीनशे दिवस लागेल तीन लाख रुपये कमवायला
- आम्ही लोढा बिल्डरच्या घशातून पैसे काढणार म्हणजे काढणार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली