शेतकरी कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटने कडून राज्यभर मध्यरात्री आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले आहे. तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर परिसरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांने गनिमी काव्याने टेंभा- मशाल आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी प्रहार च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हातात मशाल आणि गळ्यात भगवा व निळा ध्वज बांधून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर दिव्यांगांना शासकीय लाभ मिळावा,अशी मागणे घेऊन हातात मशाल घेऊन हे टेंभा आंदोलन करण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली