LOKSANDESH NEWS
राज्य सरकारने शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव दिला नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे व शेतकऱ्यांची सरकारने कर्जमाफीची दिलेले आश्वासन हे देखील पूर्ण केले नाही त्यासाठी आज प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने प्रत्येक आमदाराच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या आणि आमदार श्रीजया चव्हाण तसेच आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानासमोर मशाल आंदोलन करण्यात आले आहे यावेळी आंदोलकाच्या वतीने घोषणाबाजी करत निदर्शने देखील करण्यात आली.
सरकारने कर्जमाफी लवकरात लवकर करावी अन्यथा यापुढे देखील तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली