बेरोजगार दिव्यांग कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन
दिव्यांग कृती समिती नांदेडच्या वतीने आज विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. प्रशासनाचे विरोधात जोरदार घोषणाबाजी करून, दिव्यांगाने आक्रोश व्यक्त केला.
दिव्यांगासाठी राखीव असलेला पाच टक्के निधी देण्यात यावा, दिव्यांगांना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका देण्यात यावी, घरकुल देण्यात यावे, शासकीय आणि निमशासकीय अनुशेष भरून काढण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली