LOKSANDESH NEWS
हक्काचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठी कडा ऑफिस समोर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर येथील जवळपास २०० ते ४०० शेतकरी व महिलांनी कडा ऑफिस समोर धरणे आंदोलन केले आहे.
मराठवाड्यात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु आमचा धरणाला पाणी असून, निष्क्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे आमचे हक्काचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होते नाही.
जो पर्यंत प्रशासन आमचे हक्काचे पाणी आम्हाला सोडत नाही, तो पर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आमच्याशी चर्चा करून आमचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली