काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्या नेतृत्वात पार पडली चोपडा मतदारसंघाची आढावा बैठक
काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व जळगाव जिल्ह्याचे निरीक्षक श्याम उमाळकर यांच्या नेतृत्वाखाली चोपडा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या समस्या, अडचणी या संदर्भात बोलण्याची संधी देण्यात आली.
यावेळी चोपडा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित जिल्हा निरीक्षक यांच्यासमोर काँग्रेस पक्ष वाढीसाठी जे कार्यकर्ते काम करू इच्छितात अशा कार्यकर्त्यांना पद दिले गेले पाहिजे, पक्ष वाढीसाठी उपायोजना या संदर्भात आणि भागातील समस्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा निरीक्षकांसमोर मांडल्या. यावेळी जिल्हा निरीक्षक श्याम उमाळकर यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या पक्ष वाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे.
ज्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी जनसामान्यांमध्ये जाऊन काम केले पाहिजे, फक्त पद घेऊन पक्ष वाढत नाही तर लोकांमध्ये राहून काम करावं लागतं अशा सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.