एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ज्यांचे अस्तित्व संपवले आहे त्यांच्या टीकेकडे काय बघायचं? - उदय सामंत
ON वळसे पाटील
- या बद्दल थोडी माहिती वळसे पाटील यांच्याकडून घेतो. ते ऊर्जा मंत्री विधानसभा अध्यक्ष राहिलेत, राज्याचे गृहमंत्री राहिलेत. त्यामुळे त्यांच्या मनात काय? ते माहिती करून घेतो आणि माझ्याकडे काय माहिती ती त्यांना देतो
- कॅबिनेट सब कमिटी मध्ये एखादा मेगा प्रोजेक्ट जातो तेव्हा त्याला ३ रुपयांपर्यंत सबसिडी देतो हे जगजाहीर आहे. त्यांच्या मनात काही शंका असेल तर मी स्वतः भेटून त्याला दूर करेन
ON नारायण राणे
- वैभव नाईक माझे कॉलेज पासूनचे मित्र आहेत. माझ्या कॉलेजच्या मित्रांनी चांगल्या लोकांसोबत काम करावं असं मी म्हटलं आहे. शेवटी शिंदे हे मुख्य नेते आहेत. ते सांगतील ते आमच्या पक्षात होत असतं. राणे यांच्या सल्ल्याने जे करायचे ते करू
ON नरहरी झिरवळ लाडक्या बहिणी
- झिरवळ हे काय बोलले याबद्दल मला माहित नाही. मात्र, याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जो निवडणुकीचा अजेंडा तयार करतो त्याला पाच वर्ष अवधी असतो. त्यावर योग्य वेळी निर्णय घेतील
ON संजय गायकवाड
- पोलिसांबद्दल असे वक्तव्य करण अयोग्य आहे. दुसरं त्यांनी जाणीव झाल्यावर माफी देखील मागितली. असे वक्तव्य होऊ नये आमच्या सर्वांची भूमिका आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी आपलं नाव जगभरात लौकिक केले आहे. वैयक्तिक गोष्टीसाठी संजय गायकवाड बोलले असतील. परंतु, त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे
ON भास्कर जाधव
- छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी अजित पवार आले होते. मी पालक मंत्री म्हणून होतो. तर ते आमच्या जिल्ह्यातील आमदार म्हणून संभाजी महाराजांच्या स्मारकाची आखणी कशी आहे हे बघण्यासाठी आले होते. त्यामागे राजकीय उद्देश कोणता नव्हता
ON शिंदे बॅनर वर ठाकरे गटाची टीका
- ज्या लोकांचं अस्तित्व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संपवले आहे, त्यांच्या टीकेकडे काय बघायचं? एकनाथ शिंदे हे गावी शेती करायला गेले तरी त्यांच्यावर टीका होते. जम्मू कश्मीरला महाराष्ट्रातील लोकांच्या मदतीला गेले तरी टीका होते. परंतु, ही सगळी मंडळी लंडनला गेली तरीही आम्ही टीका करत नाही हे आमच्या मनाचा मोठेपणा आहे