काश्मीरमध्ये यवतमाळमधील पर्यटक कुटुंबाला मुस्लिम परिवाराने आपल्या घरात दिला आश्रय

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काश्मीरमध्ये यवतमाळमधील पर्यटक कुटुंबाला मुस्लिम परिवाराने आपल्या घरात दिला आश्रय

LOKSANDESH  NEWS 




काश्मीरमध्ये यवतमाळमधील पर्यटक कुटुंबाला मुस्लिम परिवाराने आपल्या घरात दिला आश्रय 



 काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यात निष्पाप पर्याटकांचा जीव गेला. यवतमाळ येथील पर्यटक कुटुंब परतीच्या प्रवासाला असताना हल्ला झाला. यामुळे हे कुटुंब भयभीत झाले. मात्र, बोनीगाम येथील खुर्शीद भाई नामक मुस्लिम कुटुंबाने अकरा जणांना आपल्या घरी आधार दिला. त्यांनी दहशतवादी हल्ल्याची रात्र मुस्लिम कुटुंबाच्या घरी काढली. यवतमाळ व नागपूर येथिल पर्यटक सुखरूप आपल्या घरी पोहचले. 

     यवतमाळ येथील नरेंद्र भांडारकर, शंकर तिडके व नागपूर येथील नातेवाईक काश्मीर येथे फिरण्यासाठी गेले होते. नागपूर येथून विमानाने दिल्ली आणि श्रीनगर येथे दहा एप्रिलला पोहचले. विविध ठिकाणी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. 22एप्रिल रोजी त्यांनी पहलगाम येथे काही ठिकाणी भेटी दिल्या. तेथून परत जाण्यासाठी प्रवास सूरू झाला. हल्ला झाल्याने पुढे जाता आले नाही. बोनीगाम येथे बस थांबवण्यात आल्या. येथे मुक्काम करण्यासाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या. खुर्शीदभाई नामक मुस्लिम कुटुंबाने भयभीत झालेल्या अकरा जणांना आपल्या घरी आणले. दोन रूम पर्यंटकांना दिल्या. किचनरूम मध्ये मुस्लिम परिवार थांबला. जेवण आणि पांघरूनाची सर्व व्यवस्था आपुलकीने केली. यामुळे यवतमाळचे कुटुंब भयमुक्त झाले. सर्व शांत झाल्यावर त्यांनी आपला प्रवास सुरु केला. सहा तासात होणाऱ्या प्रवासासाठी तेरा तास प्रवास करावा लागला. 24तारखेला हे कुटुंब सुखरूप आपल्या घरी पोहचले. बोनीगाम येथील मुस्लिम परिवार त्यांच्यासाठी देवदूत ठरल्याची भावना व्यक्त केली.

     दहा एप्रिलला आम्हील काश्मीर साठी निघालो. तेथे पोहचल्यावर अमृतसर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, श्रीनगर बघितले. पहेलगाम येथे आलो. मात्र, ढगफुटी झाल्याने सकाळी परतीचा प्रवास सुरु केला. दुपारी भ्याड हल्ला झाला. बोनिगाम येथे मुस्लिम कुटूंबाने आमची राहण्याची व्यवस्था केली. रात्र त्यांच्याकडे काढली. दुसऱ्या दिवशी पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला. 24 ला आम्ही यवतमाळला पोहोचलो.

सुरुवातीला प्रवास चांगला झाला. पहिलगाम येथे पोलीस, मिलिटरी कुणी नव्हते. ढगफुटी झाल्याने हॉटेलमध्ये थांबून सकाळी प्रवास सुरु केला. काही अंतर येत नाही तर हल्ला झाल्याची घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत आम्हाला फोन सुरु होते. परमेश्वराचे आभार मानून आम्ही निघालो.

जम्मू कश्मीरमध्ये प्रसिद्ध ठिकाणी भेटी दिल्या. बर्फ खेळला. पहलगाम येथून निघून बाहेर येत नाही तोच दुपारी हल्ला झाला. रस्ता बंद असल्यामुळे अडकून पडलो.आम्ही भयभीत झालो होतो. मुस्लिम कुटूंबाने राहण्यासाठी घरी जागा दिली. जेवणासह सर्व व्यवस्था केली.आम्ही सर्व अकरा जण होतो. माझी प्रकृती बरी नसल्याने मला काढा बनवून दिला. त्या कुटुंबाने आमची खूब काळजी घेतली.



  लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली