राहुरीतील संत गाडगे महाराज आश्रम शाळेतील शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल...
गुन्हा दाखल करण्यासाठी शाळेतील दोन शिक्षक व एक शिक्षिका होती ठाण मांडून....!
राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळेत एक शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन मुलीं बरोबर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या 25 वर्षीय आईने शाळेतील गैर कृत्य करणाऱ्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की संत गाडगे महाराज आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुली या श्रीरामपूर तालुक्यातील व राहुरी तालुक्यातील असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान विद्यार्थिनीची आई ही गाडगेबाबा आश्रम शाळेतील एका शिक्षिकेच्या मोबाईल वरून विद्यार्थिनीने आईला फोन करून सांगितले की माझ्याबरोबर शाळेतील खांडवे सर हे वाईट वागतात तू मला भेटायला ये यानंतर 25 वर्षीय विद्यार्थिनीची आई वडील व नातेवाईक भेटायला आले असता मुलीने सांगितले की दिनांक 3 एप्रिल सकाळी 11 वाजे सुमारास शाळेतील गणेश तुकाराम खांडवे यांना मी वही मागितली असता त्यांनी मला म्हटले की मला पप्पी दे बरोबरच माझ्याबरोबर अश्लील हावभाव करून माझ्या हाताला धरून त्यांच्या अवघड ठिकाणी हात लावला व अश्लील शब्दाचा वापर केला.
यावेळी त्या विद्यार्थिनीला भीती वाटली व हात झटकून पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली त्यानंतरही मला अश्लील व्हिडिओ दाखवला, यासह इतरही मुलींना याच प्रकारे अश्लील हावभाव व कृत्य करून मुलींना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गणेश तुकाराम खांडवे या शिक्षकाविरोधात पोक्सो, विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना खरी की खोटी याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहे.
सदर घटनेमुळे शिक्षक वर्गांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली