विश्वशांती नवकार दिवस निमित्त चोपड्यात सामूहिक नवकार महामंत्र जप
९ एप्रिल विश्वशांती नवकार दिवस निमित्त जगभरामध्ये विविध ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीने विश्वशांती नवकार महामंत्र जप करण्यात आला. चोपडा शहरातील विश्वनाथ जिनिंगच्या आवारात सकल जैन समाजाच्या वतीने विश्वशांती नवकार महामंत्रजपचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रारंभी महजराष्ट्रचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती व इतर मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित महिला व पुरुष युवक युवती यांच्यासह सकल जैन समाजाच्या वतीने सामूहिक विश्वशांती नवकार महामंत्र जप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, माजी विधानसभा अध्यक्ष अरूण भाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील, माजी चोपडा साखर कारखाना चेअरमन घनश्याम पाटी,ल सकल जैन समाजाचे पदाधिकारी तसेच समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्क्रीनच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील विश्वशांती नवकार दिनानिमित्त विश्वशांती महामंत्र जप साठी उपस्थित असलेल्या ठिकाणावरून संबोधित करणार होते. त्यासाठी स्क्रीन लावण्यात आले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली