अमरावती शहरात रिल्स स्टारचा धुमाकूळ; भर रस्त्यात रिल्ससाठी बनवला व्हिडिओ
रिल्स बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचा सर्वांनाच मोह असतो. मात्र, हे सगळं करताना कोणाला त्रास होणार नाही व स्वतःचा जीव देखील धोक्यात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अमरावती शहरात काल दुपारी भर उन्हात देविदास इंगोले या व्यक्तीने अमरावती शहरातील पंचवटी व राजकमल चौकात दोन रिल्सस्टारचा धुमाकूळ बघायला मिळाला.
भर रस्त्यात रिल्ससाठी व्हिडिओ बनवला. यावेळी दोन्ही बाजूने ट्राफिक लागलं असताना दोन रिल्सस्टार मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत होते. यावेळी त्यांच्या जवळून गाड्या जात होत्या तरी देखील ते दोघे हटले नाही. लाईकच्या नादात जीव धोक्यात घालणे योग्य आहे का? या घटनेची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे.
अमरावती शहराच्या पंचवटी चौकामध्ये हा ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे. दोघांनाही स्पष्टीकरणासाठी पोलिस ठाण्यात बोलावले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कल्पना बारवकर यांनी दिली. या प्रकरणात इंगोले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई पोलिस करत आहेत.