LOKSANDESH NEWS
जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याचा चांदवड शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध
जम्मू काश्मीर येथे भारतीय नागरिक पर्यटकांवर हल्ला करून अमानुषपणे त्यांची हत्या केल्याची घटना निंदनिय व घृणास्पद असून, या प्रकरणाचा चांदवड शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.
केंद्र शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व दहशतवाद्यांना धडा शिकवावा, अशी मागणी चांदवड शहर व तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. चांदवड पोलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांकडून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली