एपीएमसी बाजारात आवक वाढल्याने आंबे झाले स्वस्त!
सध्या आंब्यांचा सीझन सुरू झाल्याने नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात आंब्याला मोठी मागणी आहे. विविध प्रकारचे आंबे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत.
तर एका दिवसात बाजारात कोकणातून ७० हजार आंब्याची पेटी दाखल होत आहे. तर केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातून ४० हजार पेटी दाखल होत आहेत. म्हणजेच दिवसाला बाजार समितीमध्ये १०० हजार हून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. त्यामुळे आता ३०० रुपये डझनने आंबे मिळत आहेत. दरम्यान, या आधी फक्त महाराष्ट्रातून आंबे एमपीएससी बाजारात दाखल होत होते. आता मात्र केरळ आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातून देखील आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर आवक वाढल्याने आंबे स्वस्त झाले असून, ग्राहकांचा प्रतिसाद जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, सध्या हापूस आंब्याला मोठी मागणी असून बाराशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत पेटी विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली