LOKSANDESH NEWS
बुलढाण्यातील चिखलीत काँग्रेसकडून दहशतवाद्यांचे प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र आंदोलन
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसकडून दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत, पाकिस्तान मुर्दाबाद निषेध करणारे फलक हातात घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी भारत माता की जय, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या आहे.
ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आणि केंद्र सरकार ने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, सरकार जी ही कारवाई करेल आम्ही देशवासी म्हणून त्यांच्या मागे आहोत. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिली आहे.