LOKSANDESH NEWS
राजमाता जिजाऊ रथयात्रा खामगावात दाखल; ठिकठिकाणी भव्य स्वागत
राजमाता माँ जिजाऊ व छत्रपती शिवरायांच्या विचारातील अठरापगड जाती धर्मातील मराठा समाजाने जिजाऊ शिव शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समता, समानता, बंधुता वादी विचारांचे ऐक्याचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करावे, या करिता मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडी अभियाना अंतर्गत जिजाऊ रथयात्रा वेरूळ ते महाल पुणे पर्यंत काढण्यात आली.
रथ यात्रा खामगाव होताच उत्साहात रथयात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर यांनतर ही रथयात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून 45 दिवस साडे सहा हजार पाचशे किलोमीटर चा प्रवास करून रथयात्रा पुणे येथे महाराष्ट्र दिनाच्या दिनी पोहोचणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जाती जातीमध्ये संघर्ष, प्रबोधनाच्या माध्यमातून झालेला ओलावा असेल, कुठेतरी कमी होताना दिसून येत आहे.
यासाठी फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारे मध्ये कुणबी मराठा अशा अठरापगड जाती एकत्र करण्याचे काम या मराठा जोडो अभियानांतर्गत जिजाऊ रथयात्रेदरम्यान करण्यात येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली