आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत युती नाहीच, भाजप स्वबळावर लढणार - विजयकुमार गावित

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत युती नाहीच, भाजप स्वबळावर लढणार - विजयकुमार गावित

LOKSANDESH NEWS 



आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत युती नाहीच, भाजप स्वबळावर लढणार - विजयकुमार गावित 



 डॉ. विजयकुमार गावित, पक्षाचे प्रदेश महामंत्री अजय भोये, पक्षाचे जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष नंदुरबार तालुकाध्यक्षपदी दीपक पाटील यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती न करता भाजप स्वबळावर लढेल असे स्पष्ट केले.

भारतीय जनता पार्टीचे संघटन गावागावात वाढवण्यासाठी आपल्याला एकत्रित आणि संघटितपणे काम करायचे आहे. पक्षीय धोरण आणि विचार लक्षात घेऊन आपण सर्व ते कार्य करून दाखवाल; असा विश्वास व्यक्त करतानाच डॉ. विजयकुमार गावित यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. कार्यकर्त्यांना उद्देशून संबोधित करताना डॉ गावित यांनी स्पष्ट सांगितले की, आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका तसेच ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारे युती करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. 

लोकसभा आणि विधानसभेत महायुतीच्या घटक पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकामध्ये कुठल्याही प्रकारे युती करण्यात येणार नाही. जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच विजय होणार; असं वक्तव्य डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली