क्लस्टर योजना रद्द करण्याची निवारा हक्क समन्वय समितीची मागणी, निवारा हक्क समितीचे आंदोलन
क्लस्टरसारख्या योजनांमुळे शहरावरती त्याचा वाईट परिणाम होत असल्यामुळे ही योजना रद्द करावी अशी मागणी निवार हक्क समन्वय समिती ठाणे शहर यांच्याद्वारे आज आंदोलनातून करण्यात आली.
ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतीचे पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनेतून ठाणे महापालिका हद्दीत एकूण ४४ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याचे योजले आहे. क्लस्टर योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवरती होणाऱ्या इमारतींमुळे ठाणे शहरातील लोकसंख्या चार पटीने वाढणारा आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या तीव्र आहे.
शहरात स्वतःचे धरण नाही. लोकसंख्या वाढते वाहनांची रोधारी देखील वाढत असून, शहरात वाहतूक कोणाची समस्या देखील तीव्र होत आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. अनियोजित योजनेमुळे शहराचे विद्रुपीकरण होत चालले आहे. त्यामुळे क्लस्टर विकास सारख्या प्रकल्पाबाबत पुन्हा नव्याने सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वय समितीची मागणी आहे. या मागणीकरिता निवारा हक्क समन्वय ठाणे शहर यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी मानपाडा, गणेशनगर, आझादनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
भविष्यात शहरात अधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या वाढवणे याकरिता कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी या आंदोलनातून केली आहे. नागरिकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास थेट मंत्रालयावरती मोर्चा नेण्याचा इशारा यावेळी आंदोलनातून देण्यात आला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली