राम नामाच्या गजरात साईनंदन कॉलनी येथे मोहन वनखंडे व सौ. अनिता वनंखडे यांच्या हस्ते आरती करून रामनवमी उत्सव साजरा
मिरज येथील साईनंदन कॉलनी मिरज येथे रामनवमी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
प्रभू रामचंद्र यांचा जन्म सोहळा, निमित्ताने भक्ती संगीत, राम भजन, व महाप्रसादाचे आयोजित करण्यात आले होते.
गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे (सर), मिरज महानगर महापालिका माजी सभापती सौ. अनिता वनंखडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
सकाळी दहा वाजता श्रीराम मंदिरात सौ. वैशाली जोगळेकर यांचा "भक्ती सुगंध" हा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला या वेळी हार्मोनियम वाद रवी पवार ,तबला वादक कृष्णा भोसले , व निवेदक संजय रुपलग यांनी त्यांना साथ दिली . दुपारी बारा वाजता "स्त्री, शक्ती नवरात्र उत्सव मंडळातर्फे श्री राम नवमी निमित्त आरतीचा कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास स्वतः मोहन वनखंडे, सौ. अनिता वनखंडे, सागर वनखंडे, सौ. अनुजा वनखंडे, माजी नगरसेवक गणेश माळी, संभाजी मेंढे, बसवेश्वर सातपुते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
गत वर्षीपासून वनखंडे दाम्पत्यांनी श्रीराम नवमी निमित्त सुरू केलेल्या या कार्यक्रमामुळे साई नंदन कॉलनी मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी हजारो भाविकांनी भजनाचा व भोजनाचा आनंद लुटला.
राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात वनखंडे परिवार यांचा मोलाचा वाटा आहे.
हिंदू सण असो अथवा धार्मिक कार्य असो वनखंडे परिवार हा कोणताही भेदभाव न ठेवता अहोरात्र सेवा करत असतात