LOKSANDESH NEWS
गायरान जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना दलित आघाडीचा मोर्चा
गायरान जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना दलित आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. या प्रकल्पासाठी कास्तकार, दलित यांच्या जमिनी बळजबरीने घेतल्या जात असल्याचा आरोप ॲड आणि शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा आक्रोश पोहचवण्यासाठी हा मोर्चा काढला गेल्याची माहिती मगरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा गाव आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी पोलीस यांच्या आदेशाने गरिबांच्या जमिनी या प्रकल्पासाठी खाली केल्या जात असल्याचं मगरे म्हणाले आहेत. या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने गरिबांची घरे आणि पाळीव प्राणी जमिनीत गाडण्याचे काम प्रशासनाने केले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करत जमिनी खाली करण्याचे काम सुरू केले आहे. न्यायप्रिय प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी जाऊ नये, असा ईशारा देखील मगरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली