तरळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणास स्थानिकांचा विरोध
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम करण्यास कासार्डे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कासार्डे-आनंदनगर हद्दीतील भूसंपादनच झाले नसून मिळकतींच्या अधिकार अभिलेखात किंवा शासकीय कागदपत्रात याची नोंद नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
सदर रस्ता अस्तित्वात आल्यापासून शासनाकडे भूसंपादन झालेल्याची नोंद नाही. रस्त्याच्या सातबारांमध्ये स्थानिक जमीनदारांची मालकी दिसून येते. भूसंपादन झालेले असेल तर शासनाने ते आमच्या निदर्शनात आणून द्यावे आणि जर स्थानिक जमीनधारकांना योग्य तो मोबदला द्यावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील कोणते प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली