शनिवार नंतर पूर्व विदर्भातला मिळणार उन्हापासून दिलासा, हवामान विभागाने पूर्व विदर्भात वर्तविला पावसाचा अंदाज

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शनिवार नंतर पूर्व विदर्भातला मिळणार उन्हापासून दिलासा, हवामान विभागाने पूर्व विदर्भात वर्तविला पावसाचा अंदाज

LOKSANDESH  NEWS 



 शनिवार नंतर पूर्व विदर्भातला मिळणार उन्हापासून दिलासा, हवामान विभागाने पूर्व विदर्भात वर्तविला पावसाचा अंदाज


 मागील काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भात प्रंचड उन्हाचा प्रकोप सहन करावा लागत आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भातील बहुतेक जिल्हात उष्णतेच्या लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. हिट वेजचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पुढील दोन दिवस तापमान 45अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. उत्तर व पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने विदर्भात तीव्र- उष्णतेची लाट आली असल्याचे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

मात्र शनिवारीनंतर वातावरणात काही प्रमाणात बदल अपेक्षित असून शनिवारी रात्री उशिरा पूर्व विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्या परिस्थितीत तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.





 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली