मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रम काढण्यासाठी, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वखालील रास्ता रोको आंदोलन
इंदापूर शहरात असलेल्या मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावरील अनधिकृत अतिक्रम काढण्यासाठी, सकल हिंदू समाजाच्या, वतीने आमदार गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वखालील इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी येथे आज भर दुपारी रास्ता रोको करण्यात आला होता, भर उन्हात तब्बल तीन तास हा रास्ता रोको सुरू होता.
लेखी आश्वासन द्या तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी व आंदोलकात काही वेळ वाद निर्माण झाला होता. मात्र याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आमदार पडळकर यांना आल्यानंतर पडळकर यांनी तो स्पीकर फोन ऑन करून सर्व आंदोलकांना ऐकवला व फडणीसांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले