चोपडा तालुक्यातील शेतकरी आता आपल्या शेतातील तयार झालेला शेतीमाल मशीनच्या सहाय्याने काढून ट्रॅक्टरने कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहे.
गेल्या महिनाभरामध्ये हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणावर होती. परंतु आता हरभरा सोबत ज्वारीची आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधराशे क्विंटल ची आवक ज्वारीची होताना दिसत आहे. त्याचबरोबर मक्याची आवक देखील वाढत आहे इतर मार्केट पेक्षा चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत असल्याने शेतकरी शेतातील शेतमाल ट्रॅक्टर च्या साह्याने विक्रीला आणत आहे.
रोजचे अडीचशे तर तिनशे ट्रॅक्टर मार्केटमध्ये येत आहे. दोन सत्रा मध्ये शेतमालाचा लिलाव होत आहे. येणाऱ्या काही दिवसात मक्याची अजून आवक वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रोहिदास सोनवणे यांनी सांगितले.