LOKSANDESH NEWS
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आमदार विनोद अग्रवाल यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन
आज देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्ताने गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया शहरातील आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत मानवंदना दिली.
यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याची आठवण करून दिली आणि संविधान रचनेतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरव केला. यावेळी अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली