शिवसेनेकडून अतिरेकी हल्ल्याच्या निषेध मुकमोर्चा; सामूहिक श्रद्धांजली अर्पण
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडून हल्ला केला. यात 26 निष्पाप पर्यटक मृत्युमुखी तर अनेक जखमी झाले आहेत.
या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, संतापाची लाट उसळलेली आहे. शिवसेनेने या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. शहीद शिरीषकुमार स्मारकाजवळ मूक मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी मूक मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाताच्या दंडावर काळीपट्टी बांधण्यात आली होती. काय दोष होता त्यांच्या ? असा संतप्त सवाल करत उपस्थिता कडून अतिरेकी भ्याड हल्ल्याच्या निषेध करण्यात आला.