LOKSANDESH NEWS
स्वच्छ पाण्यासाठी मगनपूरा भागात शोले स्टाईल आंदोलन
नांदेड शहरातील मगनपुरा भागात चक्क ड्रेनेज मिश्रीत पाणी नळाला येत आहे. गेल्या 1-2 महिन्यापासून नळाला घाण पाणी येत असल्याने स्थानिक नागरिक आज सकाळीच पाण्याच्या टाकी वर चढले.
स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी नागरिकांनी हे शोले स्टाईल आंदोलन केले. त्यानंतर मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी यांना नागरिकांनी घेराव घातला.
आम्हाला जर शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर पुढील आंदोलन तीव्र करू असा इशारा मगनपूरा भागातील नागरिकांना दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली