जळगाव जिल्ह्यात उष्णताची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून तापमाना वाढलेलं आहे. दिवसा सूर्य आग ओखत असल्याने नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. चोपडा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून उन्हाचा पारा चढल्याने तापमान 40 शी पार गेले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष निर्माण करण्यात आले आहे तसेच औषधांचा देखील साठा उपलब्ध करून ठेवला आहे, लहान बालक, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध नागरिक यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
बारा ते दुपारी चार कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घराबाहेर जाताना पुरेसे पाणी पिऊन, डोक्यावर टोपी अथवा सफेद रुमाल बांधून घराबाहेर पडावे. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावे. अंगावर कोणीही काढू नये असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासुरकर यांनी केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली