LOKSANDESH NEWS
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांची घेतली भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका जाहीर केली.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी जाचक यांची भेट घेतल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय समीकरणाबाबत चर्चा सुरू झाली आहे.