चोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात; मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल
चोपडा तालुक्यात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळी बाजरी शेतकरी लागवड करीत असतो.
आता उन्हाळी बाजरी शेतातून काढणीला आली असल्याने मजुराच्या साह्याने शेतातील बाजरी आधी कापण्यात येते, त्यानंतर काही दिवस शेतात उन्हात पडू दिली जाते त्यानंतर परत मजुरांच्या साह्याने बाजरीची कंस कापली जातात व ते गोळा करून ठेवले जातात जोपर्यंत मशीन मिळत नाही तोपर्यंत शेतातच शेतातील माल पडून राहत असतो मशीन मिळाल्यानंतर बाजरी काढली जाते त्यांनंतर मार्केटला विक्रीसाठी शेतकरी घेऊन जातो.
बाजरी लागवडीपासून ते काढणीपर्यंत मजुरी आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो, परंतु ज्या वेळेस शेतकरी आपल्या शेतातील माल मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असतो तेव्हा त्या मालाचा भाव व्यापारी ठरवित असतो शेतकऱ्याला त्याचा अधिकार नसतो हमीभाव जरी शासनाने घोषित केले तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळत नाही, याची खंत बाजरी उत्पादक शेतकरी यांनी बोलून दाखवली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.