पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या प्राण्यांसाठी वनविभागामार्फत पानवट्यांची सोय
चांदवड तालुक्यात उन्हाळ्यामुळे तिरुव जंगलातील नैसर्गिक जलस्रोत झपाट्याने आटत चाललेले आहेत. परिणामी वन्यजीवांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत होती, मात्र वन विभागाने चांदवड तालुक्यातील प्राण्यांसाठी कृती पाणवठे तयार केलेले आहेत.
त्यामध्ये रायपुर, परसुल, एरंडगाव, वडनेर भैरव, गौहरण, रायपुर ,कानमंडळे, चिंचबारी आदी ठिकाणी पानवठे तयार केल्यामुळे पाण्यासाठी भटकंती प्राण्यांची टळली असून व वन्य प्राण्यांनी मानवी वस्त्यांकडे सध्या तरी पाठ फिरवली दिसत आहे. तसेच मानव व वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष थांबला आहे.
चांदवड वन विभागाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टी पूर्ण पाऊल उचललेले आहे. वन्यजीव अभयारण्य हे जैवविविधतेने नटलेले असून येथे बिबट्या, हरण, मोर, ससे, नीलगाय, अस्वल विविध प्रकारचे वन्यजीवन आढळतात व ते पाण्याअभावी दुर दुर भटकंती करताना आढळतात व उन्हाळ्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे हे प्राणी मानवी वस्ती जवळ येण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी कृती पानवट्यांची निर्मिती ही एक योग्य वेळेवर उचललेले काळजीपूर्वक पाऊल ठरले आहेत. त्यामुळे चांदवड तालुक्यात काही ठिकाणी कृत्रिम पानवठे व प्लास्टिकचे अर्धे डबे कापून व सिमेंटच्या कुंड्या तयार करून ठेवलेल्या दिसत आहे. या संदर्भात चांदवड बीपी सोमवंशी वनपाल अधिकारी चांदवड विभाग यांनी अधिक माहिती दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली