शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी.आय.डी चौकशी करावी - संजय पवार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी.आय.डी चौकशी करावी - संजय पवार


शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी.आय.डी चौकशी करावी - संजय पवार



निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापुरात रस्ते विकासासाठी १०० कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. याचे काम देखील सुरू झाले. मात्र या कामांसाठी १८ महिन्यांच्या मुदतीपैकी १६ महिने पूर्ण होऊन देखील, कोल्हापुरातील रस्त्यांचे फक्त ६५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. 

तर झालेली कामेही निकृष्ट दर्जाची असल्याचे म्हणत. आणि कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कोल्हापूर महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी रस्ते बनवण्यासाठी लागणाऱ्या ढकलगाड्यांमध्ये प्रतिकात्मक नोटा भरून आणण्यात आल्या होत्या. तर जोरदार घोषणाबाजीने महापालिका परिसर दणाणून सोडण्यात आला.

 महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी महापालिका गेट वर येऊन आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तर शंभर कोटींच्या रस्ते प्रकल्प महाघोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी सी.आय.डी चौकशी करावी, यातील खरा सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेऊन पर्दाफाश करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केलीय.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली