जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन
रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
या जनता दरबाराला प्रशासनातील सर्व खात्यांचे अधिकारी या जनता दरबारात उपस्थित होते. नागरिकांच्या समस्यांचे थेट निराकरण या जनता दरबारात करण्यात आले.
या जनता दरबारात नागरिकांनी आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक समस्यांबाबत थेट उद्योगमंत्र्यांशी संवाद साधला. एकंदरीतच रत्नागिरीतील नागरिकांसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली