बिडवलकर कुटुंबियांचे वकील किशोर वरक यांची पत्रकार परिषद
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर प्रकरणात खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यासह अन्य चार आरोपी यांच्या वर मकोका लावा, तसेच संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट या विरुद्ध सुरू असणारी हद्दपारची केस निकाली काढून त्यास हद्द पार करा यासह मयत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या मावशीला शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी,
यासह संतोष देशमुख अपहरण व खून प्रकरणाप्रमाणे या ही प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा अशी मागणी करत या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्यावर कुडाळ व नियुक्ती पोलीस स्टेशन मध्ये अपहरण, खून खुणाचा प्रयत्न या सर्व मनुष्यवधाचा गुन्हाही नोंद या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी बिडवलकर कुटुंबीयांचे कायदेशीर सल्लगार वकील किशोर वरक यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली