सामान्य कार्यकर्त्यांला शाबासकीची थाप हवी असते, उद्धव ठाकरेंनी ती देखील देण्यात कंजूसी केली - संजना घाडी
ON शिंदे गट पक्षप्रवेश
- आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत प्रवेश केला आहे
- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात कामाला ज्या पद्धतीने शिथिलता आलेली आहे आणि चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ ते मोठे होतात का? या भीतीने त्यांच्या गळचेपीचा प्रकार हा सुरू आहे, संघटनेतील महिला पदाधिकाऱ्यांना व्यवस्थित सन्मान न देणं, अशा तक्रारी असताना देखील त्यावर दुर्लक्ष करणं, या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी निराश होऊन प्रवक्ता म्हणून मी काम करत असताना ते चांगल्या पद्धतीचे काम करत होते. गेल्या चार महिन्यांपासून अचानक मला प्रवक्ता म्हणून बोलण्याकरता थांबवलं गेलं
- आता आलेल्या लिस्टमध्ये माझं नाव नव्हतं. त्यानंतर फार चर्चा झाल्या, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक ऑनलाईन लिस्ट मध्ये माझं नाव जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या सामनामध्ये दोन ओळी त्याच्यासाठी येऊ शकल्या नाहीत - ही आमच्यासारख्या शिवसैनिकांची खंत आहे
- आम्हाला काही नको असतं आम्हाला नेत्याच्या शाबासकीची थाप हवी असते. पण ती देखील देण्यात कंजूसी केली गेली
- त्यामुळे एका बाजूला मरगळ आणि शिथिलता आलेला पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत नव्या जोमाने, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, कार्यकर्त्यांमधलाच नेता जिथे पक्षाचे नेतृत्व करत आहेत असे एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने मुंबईत कामाला सुरुवात केली, हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मूळ शिवसेनेत प्रवेश केलाय
- मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभर दौरे केले आहेत
- या सगळ्या भागांमध्ये फिरत असताना महिलांच्या बऱ्याच तक्रारी होत्या की, आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ निवडणुकांपुरतं त्यांना उपयोगात आणायचं आणि त्यानंतर त्यांना बाजूला काढून ठेवायचं. अशा पद्धतीचं काम पुरुष पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसत होतं, अशी खंत महिलांनी वारंवार व्यक्त केली. पण पक्षाला या संदर्भात तोंडी आणि लेखी कल्पना देऊन देखील त्यात काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे बऱ्या महिला पक्ष सोडून जाताना दिसत आहेत